Kerala: शुक्रवार, १२ एप्रिल २०२४ रोजी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कोट्टप्पाडी भागात पाण्याने भरलेल्या खड्यात पडलेल्या एका जंगली हत्तीची सुटका करण्यात आली आहे. हत्ती खड्ड्यात पडल्यानंतर  कोटप्पाडी पंचायतीच्या परिसरात कलम १४४ सीआरपीसी जाहीर करण्यात आली होती. हत्तीला शांत करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी 24 तास प्रयत्न सुरु होते. मुख्य वन्यजीव वॉर्डनने हवामान अनुकूल असताना हत्तीला शांत करण्याची परवानगीही दिली होती. मात्र, वन्यजीव विभाग आणि पोलिसांना ट्रँक्विलायझरचा वापर न करता हत्तीची सुटका करण्यात यश आले.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)