Elephant Attacked Bike Rider: केरळमधील वायनाड जिल्ह्यातील तिरुनेली अट्टापारा भागातून हत्तीच्या हल्ल्याचा एक भयावह व्हिडिओ समोर आला आहे. एका हत्तीने अचानक एका दुचाकीस्वारावर हल्ला केला. ही घटना शनिवारी घडल्याचे सांगितले जात आहे. आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीवर जंगलातून येणाऱ्या हत्तीने अचानक हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये हत्तीने अचानक दुचाकीस्वारावर हल्ला केल्याचे दिसून येते. काही क्षणांसाठी त्या बाईकस्वाराला काय करावे हे समजले नाही, पण कसं तरी त्याने बाईक सुरू केली आणि स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवला. हत्तीच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेदरम्यान गाडीतून जाणाऱ्या एका व्यक्तीने व्हिडिओ बनवला.

जंगलात हत्तीचा दुचाकीस्वारावर हल्ला - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)