Horse Found Stranded In Flooded Area: ब्राझीलच्या रिओ ग्रांडे डो सुलमध्ये 29 एप्रिलपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील 414 शहरे पुराच्या संकटात अडकली आहेत. पूरग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणीही नाही. अनेक ठिकाणी टेलिफोन आणि इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. पुरामुळे तब्बल 99,800 घरे अंशत: किंवा पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. अशात या भागातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पूरग्रस्त भागात एक घोडा छतावर अडकलेला दिसत आहे. अतिशय भावनिक अशा या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चहुबाजूने पाणी असलेल्या भागात छताच्या एका टोकावर एक घोडा उभा आहे. या घोड्याला तिथून बाहेर पडायचे आहे मात्र त्याला मार्ग दिसत नाही. यातील दुर्दैवी गोष्ट म्हणजे मानवांप्रमाणे तो मदतीसाठी याचनाही करू शकत नाही. (हेही वाचा: Land Cracks In Barmer: राजस्थानमध्ये 1.5 एकर शेताखालची जमीन 70 फूट खोल खचली, धोकादायक परिसर लोकांसाठी बनाला Selfie Point)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)