बिल गेट्स यांनी नागपूरच्या Dolly Tapri Chaiwalla चा चहा देण्याचा अनोखा अंदाज शेअर केल्यानंतर त्याची लोकप्रियता शिखरावर गेली आहे. आता बिल गेट्स पाठोपाठ हरियाणा चे मुख्यमंत्री Nayab Singh Saini यांनी देखील डॉली कडे चहाची चव चाखली आहे. नायब सिंग सैनी यांनी गुरुग्राममधील यूट्यूब influencers च्या बैठकीत नागपूरच्या प्रसिद्ध डॉली टापरी चाय वालाचा चहा घेतला. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी 23 एप्रिल रोजी गुरुग्राममध्ये YouTubers आणि influencers सोबत एक बैठक घेतली. देशभरातील विविध राज्यांतील YouTubers आणि influencers यांनी या बैठकीत सहभाग घेतला.

Dolly Tapri Chaiwalla सोबत Nayab Singh Saini

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)