Swiggy Delivery Girl Viral Video: आपल्याला जेव्हा केव्हा घरात जेवण बनवायचा कंटाळा येतो, तेव्हा आपण घरबसल्या ऑनलाइन जेवण ऑर्डर करतो. फक्त एका क्लिक किंवा कॉलने आपल्याला आपले आवडते पदार्थ काही मिनिटांत घरपोहोच मिळतात. मात्र, लोकांना फूड डिलिव्हरीला थोडासा विलंब झालेलाही सहन होत नाही. जेवण घेऊन आलेल्या व्यक्तीची मजबुरी न समजता लोक त्याला सुनावतात.

सध्या सोशल मीडियावर स्विग्गीच्या दिव्यांग फूड डिलिव्हरी गर्लचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ही महिला व्हीलचेअरवर जेवण देण्यासाठी निघालेली पाहायला मिळत आहे. या महिलेकडे पाहून प्रत्येकाने तिच्या धैर्याला सलाम केला. तसेच अशा लोकांना रोजगार दिल्याबद्दल लोकांनी ऑनलाइन फूड कंपन्यांचे मनापासून आभार मानले आहेत. लोकांना या व्हिडिओपासून खूपचं प्रेरणा मिळत आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)