तरुणाईचे उसळते रक्त आणि त्यांना वेगासोबतच असलेले थराराचे आकर्षण संयम नसेल तर कोठे घेऊन जाईल याचा काहीच नेम नाही. दोन तरुणांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जे दुचाकीवर स्टंट करत आहेत. व्हिडिओ पाहता हे तरुण साधारण 16 ते 24 वयोगटातील असावे असे जाणवते. अर्थात त्यांच्या वयाची आणि घटनास्थळाची पुष्टी होऊ शकली नाही. तसेच, त्यांच्या ओळखीचीही पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, व्हिडिओत पाहायला मिळते की, एका डांबरी रस्त्यावरुन हे तरुण आपल्या दुचाकीवरुन अत्यंत वेगाने निघाले आहेत. दुचाकीवरुन जाताना ते दुचाकीने नागमोडी वळणे घेत थरार अनुभवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा मनोदय पुढच्या काहीच सेंकदात त्यांना वास्तव दाखवतो. दोन्ही तरुण दुचाकी घसरल्याने इतक्या जोरात रस्त्यावर आदळतात की, त्यांच्या पायातील शूजही हवेत उडतात. एक तरुण तर रस्त्यावर तीन कोलांट्या खाताना दिसतो.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)