जत्रेतील आकाश पाळणा खाली अचानक खाली कोसळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना मोहाली येथील एका जत्रेत रविवारी घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना घडली तेव्हा जत्रेसाठी आलेले अनेक लोक आकाशपाळण्यात बसून आनंद घेत होते. व्हायरल व्हिडिओत दिसते की, पाळणा आकाशातून थेट जमीनीच्या दिशेने वेगाने आला आणि आदळला. या वेळी उपस्थितांपैकी काही लोकही जखमी झाले. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि काही लाहान मुलांचाही समावेश आहे.
WATCH - Several injured after swing falls straight to the ground from the air in Mohali.#Mohali #Punjab pic.twitter.com/65LxZ5xsrP
— TIMES NOW (@TimesNow) September 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)