Kangana Ranaut Slapping Case: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला थप्पड मारणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला कॉन्स्टेबलच्या समर्थनार्थ शेतकरी संघटना बाहेर आल्या आहेत. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चासह अनेक शेतकरी संघटनांनी महिला कॉन्स्टेबलच्या समर्थनार्थ रविवारी मोहालीत मोर्चा काढला. या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करून महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली. मोहालीतील गुरुद्वारा अंब साहिब येथून निघालेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा शोध घ्यावा, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच महिला कॉन्स्टेबलवर अन्याय होता कामा नये, असेही ते म्हणाले. चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान कुलविंदर कौर यांनी कंगनाला थप्पड मारली होती. त्यानंतर कौर यांना नोकरीमधून निलंबित करण्यात आले व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कंगनाने एक वादग्रस्त विधान केले होते, यामुळे संतप्त झालेल्या कौर यांनी तिला थप्पड मारल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा: Kangana Ranaut Slapping Case: कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ पुढे आला संगीतकार Vishal Dadlani; दिला नोकरीचा प्रस्ताव)
पहा व्हिडिओ-
March for Kulvinder Kaur ✊🏻
Have you seen something so magnificent & disciplined?
Thousands and thousands of farmers March towards SSP Office Mohali, to demand justice for their sister/daughter Kulvinder Kaur.
They also demand @KanganaTeam to be booked under sedition & a… pic.twitter.com/RdYntrpsp9
— Sangha/ਸੰਘਾ/संघा/سنگھا (@FarmStudioz) June 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)