Kangana Ranaut Slapping Case: यंदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना रणौत खासदार म्हणून निवडून आली आहे. काल कंगनासोबत एक घटना घडली, ज्यानंतर ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. कंगना गुरुवारी (6 जून) संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला येत होती. त्यावेळी चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने तिला सार्वजनिकपणे थप्पड मारली. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. या घटनेनंतर महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले. आता या घटनेवर गायक आणि संगीतकार विशाल ददलानी याने आपली प्रतिक्रिया देत महिला कॉन्स्टेबलचे समर्थन केले आहे.
विशाल ददलानीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे या घटनेवर भाष्य केले. विशालने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, ‘मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही, परंतु या सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबलचा राग मी पूर्णपणे समजू शकतो. या महिला कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई झाली असेल, तर मी हे सुनिश्चित करेन की तिला काम मिळेल. जर तिला ते काम स्वीकारायचे असेल तर तिचे स्वागत आहे. जय हिंद. जय जवान जय किसान.' विशालने पुढे म्हटले आहे की, ‘जर कौर यांना ड्युटीवरून काढून टाकले असेल, तर कोणीतरी कृपया माझ्याशी संपर्क साधा आणि मी त्यांना नोकरी मिळेल याची खात्री करेन.’ घटनेनंतर महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. नंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना ताब्यातही घेण्यात आले होते. (हेही वाचा: Kangana Ranaut Slapped by CISF Constable: नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने मारली थप्पड; चंदीगड विमानतळावर घडली घटना, अभिनेत्रीचा आरोप)
पहा पोस्ट-
Singer @VishalDadlani offered to help CISF officer #KulwinderKaur who allegedly slapped actor-turned politician #KanganaRanaut at the Chandigarh airport on June 6. Vishal shared a note on his Instagram story and expressed his support to the CISF woman.
via… pic.twitter.com/QvxCOp1lKT
— IndiaToday (@IndiaToday) June 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)