Kangana Ranaut Slapped by CISF Constable: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या कंगना राणौतसोबत चंदीगड विमानतळावर गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. इथे सीआयएसएफच्या एका महिला कर्मचाऱ्याने कंगनाला थप्पड मारली आहे. कंगनाने हा आरोप केला आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनातील महिला शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या, सीआयएसएफ महिला शिपाई कुलविंदर कौर यांनी तिला थप्पड मारल्याचे समोर येत आहे. कुलविंदरला ताब्यात घेण्यात आले आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

अहवालानुसार कंगनाला चंदीगडहून दिल्लीला जायचे होते. त्यामुळे ती विमानतळावर आली होती. इथे सुरक्षा तपासणीदरम्यान सीआयएसएफ महिला कर्मचाऱ्याने तिच्या कानाखाली मारली. यानंतर कंगनाच्या सोबत असलेल्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत कंगनाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, ती नंतर विमानाने दिल्लीला रवाना झाली. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Tihar Jail: तिहार तुरुंगातील कैद्यांचा परस्परांवर चाकू हल्ला, एक जखमी)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)