Vande Bharat Train: हावडा ते रांची प्रवासातील वंदे भारत ट्रेनमधील एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये 26 जुलै रोजी, एका वृद्धाने दोन आयआरसीटीसी पँट्री कामगारांना कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना घडली.  पँट्री कामगारांनी या व्यक्तीला ‘चुकून’ मांसाहारी जेवण दिले होते. ही कथित घटना घडली तेव्हा ही वृद्ध व्यक्ती हावडाहून रांचीला जात होता. अहवालानुसार, पँट्री कामगारांनी चुकून या वृद्ध व्यक्तीला मांसाहारी अन्न दिले, त्यानंतर त्याने लेबल न वाचता ते अन्न खाल्ले. मात्र, जेवत असताना त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, त्याला मांसाहार दिला गेला आहे. यानंतर तो प्रचंड संतापला. त्याने पँट्री कामगारांना बोलावून त्यांना थप्पड मारली. मात्र, इतर प्रवाशांनी त्याच्या वागण्यावर आक्षेप घेतल्यानंतर तो शांत झाला. इतर प्रवाशांनी या वृद्ध व्यक्तीला पँट्री कामगारांची माफी मागण्यास सांगितले. या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती वृद्ध व्यक्तीला पँट्री कामगारांची माफी मागण्यास सांगत आहे. (हेही वाचा: Nitin Gadkari Old Video Goes Viral: 'देशभरात 60 किमीच्या परिसरात एकच टोल नाका, मोफत पासही मिळणार', केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा 2 वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी विचारले- 'कधी पूर्ण होणार आश्वासन?')

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)