Nitin Gadkari Old Video Goes Viral: साधारणतः दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोक नाक्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, राष्ट्रीय महामार्गांवर 60 किमीच्या आत कोणताही टोल प्लाझा नसणार आणि पुढील तीन महिन्यांत या नियमांची पूर्ण अंमलबजावणी होईल याची ते खात्री करतील. आता दोन वर्षानंतर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. 2022 मध्ये संसदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी ही टिप्पणी केली होती.

गडकरी म्हणाले होते की, ‘टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या स्थानिकांना आम्ही त्यांच्या आधार कार्डनुसार पास देऊ. मी खात्री देतो की 60 किलोमीटरच्या आत एकच टोल प्लाझा असेल. जर 60 किलोमीटरमध्ये दुसरा टोल चालू असेल, तर तो पुढील 3 महिन्यांत बंद होईल.’ आता दोन वर्षे झाली तरी, मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. (हेही वाचा: VISA, Ola Financial आणि Manappuram Finance वर RBI ची कारवाई; भरावा लागणार मोठा दंड)

पहा व्हिडिओ-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)