New EV Charging Stations: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार सतत नवनवीन पावले उचलत आहे. अशात सरकारकडून राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स बसवले जातात. भारतातील राष्ट्रीय महामार्गांवरील इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशनची संख्या 5,293 पर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, सरकारने आता 7,432 नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यापैकी 5,833 महामार्गांवर स्थापित केले जातील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली.

देशात राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या 5293 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनमध्ये, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत उभारण्यात आलेल्या 4729 ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचा समावेश असून, त्यासाठी 178 कोटी खर्च करण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत तीन तेल वितरण कंपन्यांच्या माध्यमातून ही चार्जिंग स्टेशन्स बसवली जातील. सद्यस्थितीत, ईव्ही चार्जिंग स्टेशन्ससाठी राष्ट्रीय महामार्गांलगत कोणतेही ऊर्जा केंद्र उभारण्याची सरकारची योजना नाही. राष्ट्रीय महामार्गांवरील इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्सच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात सर्वाधिक 750 चार्जिंग स्टेशन्स आहेत. (हेही वाचा: BMW CE 04 भारतात लॉन्च, किंमत, फिचर्स आणि बरंच काही, घ्या जाणून)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)