Mohali Murder Video: पंजाबच्या मोहालीमध्ये शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली. या ठिकाणी एका वर्दळीच्या रस्त्यावर एका 36 वर्षीय व्यक्तीने 31 वर्षीय महिलेची तलवारीने हत्या केली. पीडित महिला कामावर जात असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला. महिलेने लग्नास नकार दिल्याने आरोपीने हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गजबजलेला रस्ता आणि लोकांची उपस्थिती असतानाही मुलीच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. हल्लेखोर रस्त्याच्या मधोमध लोकांसमोर तरुणीवर तलवारीने हल्ला करत राहिला आणि मुलगी मदतीसाठी ओरडत राहिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी काही वेळातच अटक केली असली, तरी त्याची ओळख उघड झाली नाही. अहवालानुसार, मोहालीच्या फेज 5 मधील एका बँकेत काम करणारी 31 वर्षीय बलजिंदर कौर इतर तीन मुलींसह ड्युटीवर जाण्यासाठी ऑटोमधून खाली उतरताच, तिची वाट पाहणाऱ्या एका तरुणाने अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला सुरू केला. मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी धावली, मात्र हल्लेखोर तिचा पाठलाग करत राहिला आणि तिच्यावर हल्ला केला. मुलगी जखमी होऊन खाली पडल्यानंतरही हल्लेखोराने तिच्यावर हल्ला सुरूच ठेवला. त्यानंतर घटनास्थळावरून तो पळून गेला. मुलीला मोहालीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा: वांद्रे मध्ये अभिनेत्री Raveena Tandon ची वृद्ध महिलेला मारहाण? पीडित कुटुंबाचा पोलिस स्टेशन मध्ये अभिनेत्री नशेत असल्याचा दावा)
पहा व्हिडिओ-
Shocking: CCTV footage from Mohali, shows a person murdering a girl with a sword in the morning. According to the initial investigation, the boy was pressuring the girl to marry him, but when she refused, he took this drastic step. They have known each other for the last 3-4… pic.twitter.com/k0OJZZGWlu
— Gagandeep Singh (@Gagan4344) June 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)