Minister Dhananjay Munde Resigns: अखेर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा; सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे वाढला होता दबाव
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, जनतेचा वाढता रोष आणि विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे सहकारी वाल्मिक कराड याच्यावर आरोप ठेवण्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे नाव जोडल्यामुळे, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवर दबाव सतत वाढत होता. आता धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. राजीनाम्याची बातमी आल्यानंतर फडणवीस म्हणाले की, मुंडे यांनी राजीनामा माझ्याकडे सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवला आहे.
अशात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, जनतेचा वाढता रोष आणि विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री फडणवीस यांची भेट घेतली आणि देशमुख हत्या प्रकरण आणि कराड याला आरोपी क्रमांक एक बनवण्यात आलेल्या इतर दोन संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दाखल केलेल्या आरोपपत्राच्या निकालावर चर्चा केली. (हेही वाचा: Dhananjay Munde Appeals Against Maintenance Order: करुणा मुंडे यांच्याशी लग्न झालचं नाही! धनंजय मुंडे यांनी पोटगी देण्याच्या आदेशाविरुद्ध दाखल केले सत्र न्यायालयात अपील)
Minister Dhananjay Munde Resigns:
धनंजय मुंडे यांना पदमुक्त केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा #DhananjayMunde #DevendraFadnavis #SantoshDeshmukh https://t.co/SD2MTvYYWM
— Lokmat (@lokmat) March 4, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2025 11:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

