राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना खुशखबर दिली तसेच एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती. ही योजना आजपासून लागू होणार आहे. ही महिलांसाठी मोठी बातमी आहे. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना बसप्रवासात 50 टक्के सवलत मिळते. 75 वयापेक्षा जास्त असणाऱ्यांना एसटीने मोफत प्रवास करता येतो. या योजनेला एसटी महामंडाळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणुन ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.
महिला सन्मान योजना pic.twitter.com/qIE9WsRJQU
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) March 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)