गेले अनेक दिवस शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे. एकमेकांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे दोन्ही पक्षातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात आज संजय राऊत यांनी 'इंतजार करो कलतक!' असे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी किरीट सोमय्या, बीजेपी महाराष्ट्र, पीएमओ इंडिया, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींची नावे नमूद केली आहेत. सोबतच त्यांनी 'संकल्प भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा' असे भाजपचे (BJP) बॅनरदेखील जोडले आहे. यामुळे उद्या काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)