मुंबईतील खार परिसरात काही तरुणांनी एका कोरीयन महिलेचा लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान छळ केल्याची घटना पुढे येत आहे. पीडितेने या घटनेची माहिती ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. महिलेने व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार सुमारे 1000 पेक्षाही अधिक व्हिवर्ससमोर लाईव्ह स्ट्रीम सुरु असताना या तरुणांनी त्याच्यासोबत त्रासदायक कृत्य केले. म्होची इन नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोरियन स्ट्रमरने ट्विटरवर तिच्यावर बेतलेली कहाणी सांगितली. पोस्टमध्ये ती म्हणाली, "काल रात्री स्ट्रीममध्ये एक माणूस होता ज्याने मला त्रास दिला. मी प्रकरण वाढू नये यासाठी तेथून निघून जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. तो व्यक्ती त्याच्या मित्रासोबत होता. ती पुढे म्हणाली, काही लोक म्हणाले की मी खूप मैत्रीपूर्ण आणि संभाषणात गुंतून राहिल्यामुळे याची सुरुवात झाली. त्यांनी मला स्ट्रीमिंगबद्दल मला पुन्हा विचार सांगितले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)