शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकार कोसळत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सेनेच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे हे आमदारांच्या एका मोठ्या चमूसह गुवाहाटी येथे थांबले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर भाजपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सध्याच्या या राजकीय उलथापालथी दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी फेसबुक लाईव्ह करणार आहेत. मुख्यमंत्री सोशल मीडियावर महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. फेसबुकद्वारे होणाऱ्या या संवादाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, मुख्यमंत्री नेमकी कोणती मोठी घोषणा करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तुम्ही उद्धव ठाकरे यांचा हा आजचा संवाद या ठिकाणी पाहू शकाल-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)