Viral video: आयएएस टीना दाबीला राजस्थानमधील बारमेर येथे एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण जालपा गावच्या महिला सरपंचाने स्टेजवर इंग्रजीत भाषण केल्याने टीना दाबीसह सगळेच अवाक् झाले. सोनू कंवर असे या महिला सरपंचाचे नाव आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 'महिला सरपंचाने घुंगट घेतले आहे आणि पारंपरिक पोशाखात दिसत आहे. महिला सरपंच आपल्या भाषणात म्हणाल्या, 'या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होताना मला खूप आनंद होत आहे. सर्वप्रथम मी जिल्हा दंडाधिकारी टीना दाबी यांचे स्वागत करते. एक महिला असल्याने मला टीना दाबीचे स्वागत करताना अभिमान वाटतो. महिला सरपंचाच्या या भाषणानंतर सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे. @KailashSodha_94 या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Konkan Railway Recruitment 2024: कोकण रेल्वेमध्ये तंत्रज्ञ, स्टेशन मास्टरसह अनेक पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर
येथे पाहा, इंग्रजीत भाषण करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ
बाड़मेर में IAS टीना डाबी @dabi_tina के सामने जब राजपूती पोशाक और घूँघट में जालीपा महिला सरपंच सोनू कँवर ने जब अपना उद्बोधन अंग्रेज़ी से शुरू किया तो उपस्थित सब लोग चौंक गए और टीना डाबी के चेहरे की मुस्कान बयां कर रही है l..
जिला कलेक्टर खुद को ताली बजाने से नही रोक पाए pic.twitter.com/fLYuo0gqJo
— Kailash Singh Sodha (@KailashSodha_94) September 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)