Operation Sindoor च्या माध्यमातून भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. कालपासून सध्या शस्त्रसंधी लागू असल्याने दोन्ही देशांकडून हल्ले- प्रतिहल्ले थांबवण्यात आले आहे. दरम्यान 7 मे पासून सुरू झालेल्या या ऑपरेशन सिंदुर नंतर आज पहिल्यांदाच पीएम मोदी जाहीर व्यासापीठावरून संबोधित करणार आहेत त्यामुळे आज पीएम मोदी काय बोलणार? याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. भारतीयांना पीआयबी च्या अधिकृत युट्युब चॅनल सह केंद्र सरकारच्या काही सोशल मीडीया प्लॅटफ़ॉर्मवर मोदींचे भाषण बघता येणार आहे.
पीएम नरेंद्र मोदी यांचे भाषण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)