महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आज एक मोठी गोष्ट घडली. आज संध्याकाळी उशिरा उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोशल मिडियावर जनतेशी संवाद साधताना त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री राजभवनावर पोहोचून त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला. यावेळी शिवसैनिकांनी राजभवनावर मोठी गर्दी केली होती. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंड केल्याने उद्धव ठाकरेंना हा राजीनामा द्यावा लागला. आता लवकरच भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतो.
#WATCH Mumbai | Uddhav Thackeray waves his hand as leaves from Raj Bhavan after submitting his resignation as Maharashtra CM to Governor Bhagat Singh Koshyari. pic.twitter.com/IWWj6UsGJ1
— ANI (@ANI) June 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)