मुंबई, ठाणे सह कोकण किनारपट्टीवर मागील काही तास जोरदार पावसच्या सरी बरसल्या आहेत. मागील 24 तास या भागात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम आहे. अशामध्ये आता ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या उल्हास नदीने बदलापूर, मोहने आणि जांभूळ पाडा मध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. काल बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रूळांवर पाणी आल्याने काही काळ रेल्वे सेवा ठप्प होती.
पहा ट्वीट
ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या उल्हास नदीने बदलापूर, मोहने आणि जांभूळ पाडा या शहराजवळ धोक्याची पातळी ओलांडली. pic.twitter.com/ULi5wExhKL
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)