एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटना तसेच संघर्ष एसटी कामगार संघटनेनं बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला मुंबई उच्च न्यायालयानं तातडीचे अंतरिम आदेश देत संप करण्यास मनाई केली होती. अशातच आज शुक्रवारी एसटीच्या संपासंदर्भात होणाऱ्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे..एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केलीय, असं असलं तरी काल राज्यभरातल्या अडीचशेपैकी जवळपास 59 एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.
सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत.
पण माझी एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की, आत्महत्येसारखे टोकाचे आणि चुकीचे पाऊल उचलू नका !
आपण ही लढाई एकत्रित आणि भक्कमपणे न्यायालयात लढू ! https://t.co/lNsmTL5ZY3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2021
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याची विनंती केली आहे. फडणवीस यांनी ट्विट करत ही विनंती केली आहे. “सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)