महाराष्ट्रात शिवसेनेतील आमदार फोडण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत. फाटक यांच्यासोबत आणखी दोन आमदार संजय राठोड आणि दादाजी भुसे हेही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. यावर संजय राऊत यांनी ट्विट करुन कृषी मंत्री दादा भुसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या.
Tweet
खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात.
सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत.
राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)