Rupali Thombare यांचा मनसे ला रामराम नंतर आता महाविकास आघाडीत स्थिरावण्याचा मानस व्यक्त; NCP मध्ये प्रवेशाची शक्यता, पहा ट्वीट
काही दिवसांपूर्वी शरद पवार, शिवसेनेचे वरूण सरदेसाई यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत आता त्या काम करताना दिसू शकतात हे निश्चित झालं आहे.
मनसे च्या धडाडीच्या महिला नेत्या म्हणून रूपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांची ओळख होती. पण त्यांनी आता मनसे ला रामराम ठोकत महाविकास आघाडीत स्थिरावण्याचा मानस व्यक्त केला आहे. आज त्यांनी ट्वीट करत आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय असं सूचक ट्वीट त्यांनी केले आहे.
Rupali Thombare Tweet
आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार ...@NCPspeaks @ShivSena@INCIndia
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2021 11:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

