भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज संध्याकाळी 6-8 दरम्यान बिपरजॉय चक्रीवादळाच्या लॅन्डफॉलला सुरूवात होणार आहे. गुजरात मध्ये हा लॅन्डफॉल होणार असला तरीही मुंबईतही आज सतर्कता पाळली जात आहे. समुद्र किनारी लोकांनी जाऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. आजही मुंबईत भरतीच्या वेळेस उंच लाटा उडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. BMC Appoint Lifeguards On Mumbai Beaches: मुंबई महापालिकेकडून समुद्र किनारपट्टीवर 120 जवरक्षक तैनात .
पहा दृष्य
#WATCH| Maharashtra: Rough seas at Gateway of India as #CycloneBiparjoy is excepted to make landfall in Gujarat between 6pm-8pm pic.twitter.com/WjlKkQFUzx
— ANI (@ANI) June 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)