BMC Appoint Lifeguards On Mumbai Beaches: मुंबई महापालिकेकडून समुद्र किनारपट्टीवर 120 जवरक्षक तैनात

समुद्रकिनारपट्टीवर तैनात असलेले जीवनरक्षक प्रामुख्याने समुद्र खवळलेला असताना नागरिकांना पाण्यात जाण्यापासून परावृत्त करतील. अगदिच काही आणिबाणीची स्थिती निर्माण झाली तर ते त्यांना वाचवतीलच परंतू तातडीने इतरही मदत उपलब्ध करुन देतील. बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, मुंबई महापालिकेने दिली आहे.

BMC Appoint Lifeguards On Mumbai Beaches: मुंबई महापालिकेकडून समुद्र किनारपट्टीवर 120 जवरक्षक तैनात
Mumbai Beaches | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील सर्व समुद्र किनारपट्टीवर (Mumbai Beaches) जीवनरक्षक (Lifeguards) नेमण्याचा निर्मय मुंबई महापालिकेने (BMC) घेतला आहे. मुंबईत साधारण सहा समुद्र किनारे आहेत. या सर्व कनाऱ्यांवर 120 जीवनरक्षक तैनात असतील. जे समुद्र किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या नागरिकांना खोल समुद्रात जाण्यापासून आणि पाण्यात बुडत असलेल्यांना वाचविण्यासाठी मदत करतील. हे सर्व जीवनरक्षक दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम करतील.

समुद्रकिनारपट्टीवर तैनात असलेले जीवनरक्षक प्रामुख्याने समुद्र खवळलेला असताना नागरिकांना पाण्यात जाण्यापासून परावृत्त करतील. अगदिच काही आणिबाणीची स्थिती निर्माण झाली तर ते त्यांना वाचवतीलच परंतू तातडीने इतरही मदत उपलब्ध करुन देतील. बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, मुंबई महापालिकेने दिली आहे. (हेही वाचा, BMC on Siddhivinayak Temple: मुंबई महापालिकेची सिद्धिविनायक मंदिराला नोटीस, ज्वलनशिल पदार्थांचा साठा केल्याचा आरोप, लाडवाचा कारखानाही अनधिकृत)

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर नुकताच एक मोठा अपघात झाला होता. ज्यात सहा जणांचे प्राण गेले होते. समुद्राला भरती असताना आणि खास करुन बिपरजॉय वादळाचा परिणाम म्हणून उंचच उंच लाटा किनाऱ्यावर उधळत असताना हे पर्यटक पाण्यात शिरले होते. या अपघातानंतर बीएमसीने तातडीने कारवाई करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2023 09:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).