मुंबई महापालिकेने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाला नोटीस (BMC Notice to Siddhivinayak Temple Mumbai) बजावली आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रतीक्षालय इमारतीच्या तळमजल्यावर ज्वलनशिल पदार्थांचा साठा केल्याचा आणि इथे असलेला लाडून बनविण्याचा कारणाखाना अनधिकृत असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. मुंबई पालिकेच्या दादर जी/उत्तर, इमारत व कारखाना विभागाने ही नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर देखभाल दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यासाठी इथे एक लोखंडी जिनाही काढण्यात आला आहे. शिवा, तूप, तेल तेल यांसारखे ज्वलनशील पादार्थ मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच काळजी घेण्यात आली नाही.
बीएमसीच्या नोटीशीत पुढे म्हटले आहे की, मंदिर आवारातच लाडू बनविण्याचा कारखाना सुरु असून तो अनधिकृत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारही प्राप्त झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या कारखाना विभागाने 12 मार्च 2023 रोजी मंदिर आवाराची पाहणी केली. या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही विशेष काळजी घेण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले, असे या नोटीशीमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, BMC School News: धक्कादायक! मुंबई महापालिका शाळांच्या भाडेतत्वावरील खोल्या अधिकाऱ्यांनी परस्परच विकल्या)
सिद्धिविनायक दर्शन येथे घ्या लाईव्ह
दरम्यान, पालिकेच्या नोटीशीबद्दल मंदिर न्यासाकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. त्यावर आमच्याकडे सर्व प्रकारचे परवाने आहेत. यात आरोग्य आणि अग्निशमन दलाचाही समावेश आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिर प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेते. तसेच महापालिकेकडून त्यासंदर्भात देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालनही करते. पालिकेच्या नोटीसला सर्व कागदपत्रांसह उत्तर दिले जाईल, असेही मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.