मुंबई पोलिसांनी गुरुवारी 'मुद्देमाल हस्तांतरण’ कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये विविध गुन्हेगारी प्रकरणांमधून जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या. तपासादरम्यान जप्त केलेल्या, चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या गोष्टी परत करण्याच्या उपक्रमाचा हा एक भाग होता. शनिवारी या कार्यक्रमादरम्यान परत केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत तब्बल 6.63 कोटी रुपये होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर या कार्यक्रमाचे फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यात न्याय आणि सार्वजनिक सेवेबद्दलची त्यांची वचनबद्धता अधोरेखित होते. या कार्यक्रमादरम्यान, झोन 10 पोलीस ठाण्यांनी जप्त केलेल्या विविध वस्तू त्यांच्या मालकांना परत केल्या. यामध्ये 1.68 कोटी रुपये किमतीचे 1.9 किलो सोन्याचे दागिने, 2.35 कोटी रुपये किमतीची वाहने, 1.50 कोटी रुपये रोख रक्कम आणि 1.37 कोटी रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा समावेश होता. हा मुद्देमाल पोलीस सह आयुक्त (का. व सु.) श्री. सत्य नारायण आणि अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा. विभाग श्री. परमजीत सिंग दहिया यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आला. (हेही वाचा: Shirdi Ram Navami 2025 Festival: शिर्डीमधील रामनवमी उत्सवादरम्यान साईबाबा मंदिराला मिळाले 4.26 कोटींचे दान; अडीच लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन)
मुंबई पोलिसांनी परत केला गुन्हेगारांकडून जप्त केलेला माल:
Mumbai Police Returns Recovered Valuables From Criminals Worth ₹6.63 Crore in 'Muddemal Return' Program#mumbai #mumbainews #latestnews #mumbaipolice https://t.co/kVU8gFZASe
— Free Press Journal (@fpjindia) April 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)