Pune: आठवड्याच्या सुरुवातीलाच पुण्यातील सिंहगड रोडवर (Sinhagad Road) मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. सकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत वाहने 6 किलोमीटरपर्यंत रांगेत अडकली (Pune Traffic Jam)होती. रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्या होत्या. मुख्य सिंहगड रोड आणि पर्यायी कालव्याच्या बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा पहायला मिळाल्या. कोथरूड आणि कर्वेनगरला जोडणारा राजाराम पुलाचा एक भाग देखभालीसाठी बंद केल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी विलंब टाळण्यासाठी म्हात्रे पूल, दांडेकर पूल, दत्तवाडी किंवा वारजे मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे सुचवले आहे.

सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)