ग्लाेबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना परदेशातील स्कॉलरशीप मिळाली आहे. त्यासाठी त्यांना तिकडे शिक्षणासाठी जायचे आहे व म्हणून त्यांनी रजेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, रितसर शिक्षण विभागाकडून प्रस्ताव येऊ द्या, मंजुरी देता येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर डिसले गुरुजी यांचा प्रशासनाकडून छळ होत असल्याचा आरोप झाला होता. आता डिसले गुरुजी यांचा रजेचा अर्ज मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी ट्वीट करत माहिती दिली की, 'सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO दिलीप स्वामी साहेबांनी अध्ययन रजेचा अर्ज मंजूर केला आहे. माननीय वर्षा गायकवाड मॅडम, आदरणीय बच्चू कडू साहेब, यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे आभार व्यक्त करतो.'
सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO श्री.दिलीप स्वामी साहेबांनी अध्ययन रजेचा अर्ज मंजूर केला आहे.
माननीय @VarshaEGaikwad मॅडम, आदरणीय @RealBacchuKadu साहेब,यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे आभार व्यक्त करतो.
— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) January 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)