लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे (Raju Parve) यांनी भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. रामटेकमधून कृपाल तुमने यांच्या जागी राजू पारवे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
Congress MLA Raju Parve resigns from Congress & joins Shiv Sena in presence of CM Ekanth Shinde. Mr Parve likely to be fielded by NDA in Ramtek Lok sabha seat against Congress nominee Rashmi Barve. She was former president of Nagpur Zilla Parishad @NewIndianXpress pic.twitter.com/jXUVsQpA34
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) March 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)