Railway Recruitment Board Examination: मध्य रेल्वेने रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि नागपूर दरम्यान 10 विशेष ट्रेन ट्रिप चालवण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेनुसार, ट्रेन क्रमांक 01103 RRB स्पेशल सीएसएमटीहून दुपारी 3:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:50 वाजता नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 01104 RRB स्पेशल नागपूरहून दुपारी 1:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:10 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या 01103 आणि 01104 क्रमांकाच्या विशेष गाड्या अनुक्रमे 23 ते 27 नोव्हेंबर आणि 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान दररोज धावतील.
या विशेष गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे दोन्ही दिशेने थांबतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या गाड्यांमध्ये दोन एसी-३ टायर, आठ स्लीपर क्लास आणि आठ द्वितीय श्रेणीचे आसन डबे असतील, ज्यात दोन ब्रेक व्हॅन असतील. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि irctc.co.in या वेबसाइटवर विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. (हेही वाचा: Maharashtra Board Exam Time Table 2025: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा)
रेल्वे भरती बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी 10 विशेष गाड्या-
🚆Central Railway Special Exam Train Alert.🚆
Special Train (01103/01104) will run between CSMT and Nagpur to assist candidates appearing for the RRB Exam.
Plan your journey and ensure you're on time for your exam#RRBExam #IndianRailways #SpecialTrain pic.twitter.com/61pFhTjWCg
— DRM Bhusaval (@BhusavalDivn) November 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)