गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पाऊसाने थैमान घातले आहे. हवामान हत्याने आज संध्याकाळी राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पुण्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात दुपारी 4 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली व बघता बघता अनेक रस्ते जलमय झाले. यामुळे शहरातील नागरिकांची वाहतुकीची कोंडीसह इतर समस्यांना सामोरे जावे लागले. डेक्कन, कर्वे नगर शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पुढील दोन दिवस अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)