Pune Porsche Accident Case: पुण्यातील पोर्श कार हिट अँड रन प्रकरणी महाराष्ट्र सरकार वेगाने कारवाई करत आहे. सुरुवातीला या हाय-प्रोफाइल प्रकरणात बाल न्याय मंडळाने (JJB) आरोपी अल्पवयीन मुलाची किरकोळ शिक्षेसह सुटका केली होती. मात्र प्रकरणाने जोर धरल्यानंतर जेजेबीने आपला निर्णय रद्द करून, आरोपीला निरीक्षण केंद्रात पाठवले. आता महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाने जेजेबीच्या दोन सदस्यांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. आदेश देताना नियमांचे पालन झाले की नाही, हेही समिती पाहणार आहे.

पोर्श कार अपघातानंतर काही तासांनी जेजेबीने अल्पवयीन व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. जेजेबीने या आरोपी अल्पवयीन मुलाला रस्ता अपघातांवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. मंडळाच्या या निर्णयावर चौफेर टीका झाली. आता या निर्णयाची चौकशी होणार आहे. तीन सदस्यीय जेजेबीमध्ये न्यायालयाने नियुक्त केलेले एक सदस्य आणि राज्य सरकारने नियुक्त केलेले दोन सदस्य असतात. (हेही वाचा: Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)