सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. अशात मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे.
BMC's powai lake overflows today !
The artificial lake with a storage capacity of 545 crore litres warer, was built in the year 1890
Since water in the Powai lake is not potable, it is mainly used for industrial purposes. pic.twitter.com/aSUsXA1EJw
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)