मुंबईचे पालकमंत्री Deepak Kesarkar ऐकून घेणार मुंबईकरांच्या समस्या; नागरिकांना सूचना, निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन

बुधवार दि 10 मे रोजी महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, सी विभाग कार्यालय, चंदनवाडी, मरीन लाईन्स येथे तर गुरूवार दि 11 मे रोजी ‘डी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, डी विभाग कार्यालय, ग्रँट रोड (प.) येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत पालकमंत्री श्री. केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील.

मुंबईचे पालकमंत्री Deepak Kesarkar ऐकून घेणार मुंबईकरांच्या समस्या; नागरिकांना सूचना, निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन
Deepak Kesarkar | (Photo Credit - Twitter)

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरूवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जाणून घ्या केव्हा आणि कुठे होईल संवाद- 

बुधवार दि 10 मे रोजी महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, सी विभाग कार्यालय, चंदनवाडी, मरीन लाईन्स येथे तर गुरूवार दि 11 मे रोजी ‘डी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, डी विभाग कार्यालय, ग्रँट रोड (प.) येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत पालकमंत्री श्री. केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे. (हेही वाचा: 'एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा'; सीमाभागातील मराठी मतदारांना राज ठाकरे यांचं कळकळीचं आवाहन)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2023 11:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).