महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा विषय जरी जुना असला तरीही तो आजही धगधगदा आहे. सीमाभागात मराठी भाषिकावर अन्याय होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असला तरीही कर्नाटकात 10 मे ला विधानसभेसाठी मतदान होत असताना मराठीची गळचेपी रोखण्यासाठी विधानसभेत मराठी आमदारांचा आवाज बुलंद असणं गरजेचे असल्याचं सांगत आता राज ठाकरे यांनीही सीमाभागातील मराठी मतदारांना एकजुट दाखवत मराठी उमेदवारालाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. एक ट्वीटर पोस्ट शेअर करत त्यांनी हे आवाहन केलं आहे. Karnataka Assembly Election 2023: ... तर मराठी भाषिकांनी ' जय भवानी जय शिवाजी' म्हणून मतदान करा; उद्धव ठाकरेंनी सुनावले (Watch Video) .

राज ठाकरे यांची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)