अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पोलिसांच्या गराड्यात आणि प्रसारमाध्यमांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अवघ्या देशात या हत्येनंतर खळबळ उडाली. दरम्यान, या हत्येवरुन दोन गट पुढे आले आहेत. त्यापैकी एक गट हत्येचे समर्थन करतो तर दुसरा हत्येला विरोध करतो आणि अशी घटना चुकीची असल्याचे सांगतो. दरम्यान, याच हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये पोस्टर्स झळकले आहेत. या पोस्टरबाबत विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या तक्रारीवरुन बीड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी तिघांना अटकही झाली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)