महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई स्टेशनजवळ आज (27 ऑक्टोबर) मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. या अपघातामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आठ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये वसई रोड स्टेशनवर मालगाडी रुळावरून घसरल्याचे दिसत आहे. मोटार पायलटने जवळच्या स्टेशन मास्टरला रुळावरून घसरलेल्या ट्रेनची माहिती दिली. त्यानंतर स्थानक प्रशासनाला याची माहिती मिळाली. एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अपघातामुळे त्या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत किंवा अन्य मार्गाने पाठवल्या जात आहेत

(हेही वाचा: Marathwada Suicide Case: मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांची गळफास घेऊन आत्महत्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)