पालघर मध्ये 27 वर्षीय दुचाकीस्वाराचा कार च्या धडकेमध्ये मृत्यू झाला आहे. मनोर मध्ये भरधाव कारने त्याला उडवले आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून दोघांना ताब्यात घेतलं आहे. सध्या सीसीटीव्ही तपासून नेमकं कार कोण चालवत होतं याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोघांना हॉस्पिटल मध्ये नेले असून त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात येणार आहे. मृत मुलाचं नाव सागर गजानन पाटील आहे.  मागील काही महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी हिट अ‍ॅन्ड रन ची प्रकरणं समोर आली आहेत. सध्या या घटना टाळण्यासाठी कडक नियम अंमलबजावणी सुरू आहे. Professor Dies After Hit By Car at Virar: विरारमध्ये कारने धडक दिल्याने 45 वर्षीय प्राध्यापिकेचा मृत्यू; मद्यधुंद कार चालकाला अटक .

पालघर मध्ये हिट अ‍ॅन्ड रन  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)