राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबले आहे. यावरुन राजकारण रंगत आहे. राज्य विरुद्ध केंद्र असा वाद उफाळला आहे. यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील उडी घेतली आहे. आपला देश पाकिस्तानला मोफत लसी पुरवत आहे. मात्र महाराष्ट्राला देण्यासाठी राजकारण केलं जात आहे. भाजपचे राज्य आणि केंद्रीय नेते महाराष्ट्राला लक्ष्य करत आहे आणि त्यांना याचे विपरित परिणाम नक्कीच भोगावे लागतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)