महाराष्ट्रात सध्या राजकीय महाभारत सुरू आहे. शिवसेनेच्या सुमारे 40 आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. या पार्श्वभुमीवर ठाण्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ श्रीकांत शिंदे यांच्याकडून ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी म्हस्के यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकाही केली होती. त्यानंतर आता त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा..
जात,गोत्र अन् धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना ,शिवसेना...!
शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच..
पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.
जय महाराष्ट्र!@uddhavthackeray
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)