बुधवारी, 15 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या भाऊबीजच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी वाढती गर्दी पाहता, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने 145 जादा बसेस चालवण्याची घोषणा केली आहे. या बसेस मुंबईतून मीरा-भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबईपर्यंत चालणार आहेत. प्रवाशांच्या वर्दळीचे व्यवस्थापन करण्यासाठी, बेस्टचे निरीक्षक रेल्वे स्थानके आणि प्रमुख बस थांब्यांच्या बाहेर गर्दीच्या ठिकाणी तैनात केले जातील. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबरला अधिक बसेसची गरज भासल्यास, बस थांब्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी या ज्यादा बसेस व्यस्त मार्गांवर तैनात केल्या जातील. या उपक्रमाचा उद्देश सणासुदीच्या निमित्ताने लोकांसाठी एकूण प्रवासाचा अनुभव वाढवणे हा आहे. (हेही वाचा: Pune Pollution: पुण्याच्या हवेची गुणवत्ता खालवली, अनेक ठिकाणी परिस्थिती चिंताजनक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)