Air Pollution | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबईसह दिल्लीच्या हवेतील विषारी घटकांचे प्रमाण वाढल्याने सध्या देशात सर्वांचीच चिंता वाढली आहे. मुंबई हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टानेही सरकारला वायू प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश हे दिले आहेत. मुंबई दिल्ली पाठोपाठ आता  पुण्यात (Pune) मागील अनेक दिवसांपासून हवेची (Air) गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीत खास करून प्रत्येक वर्षी लक्ष्मी पूजनानंतर वायू प्रदूषणात (Air Pollution) प्रचंड वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं. फटाक्यांच्या आतिषबाजीने होणारे प्रदूषण यामुळे श्वसनाचे त्रास नागरिकांना होत आहेत. याच कारणामुळे नागरिकही त्रस्त झाल्याचं चित्र आहे. सफर या संस्थेच्या आकडेवारीनुसार पी.एम.2.5 या धूलिकणांचे प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात आलं. (हेही वाचा - Mumbai Air Pollution: दिवाळीत मुंबईकरांकडून उच्च न्यायालयाच्या फटाके फोडण्याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन; पोलिसांनी दाखल केले 784 FIRs)

पु्ण्याचा सध्याचा  AQI हा 351 आहे. त्यातच Pollutant चा पीएम हा 2.5 इतका आहे. पुण्यातील इतर शहरांची स्थिती आणि त्यांचा  AQI किती आहे. तसेच . PM 2.5 मुळे हृदयविकार, दमा आणि नवजात मुलांच्या वजनात फरक पडणे यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. PM 2.5 च्या वाढलेल्या पातळीमुळे दृश्यमानता कमी होऊ शकते आणि हवेत धुके दिसू लागते. अशी सध्याची पुण्याची स्थिती असली तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेची गुणवत्ता कमी होत नसल्याचं सांगण्यात येत आहे.

लक्ष्मी पूजनानंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले, त्यावर कुठलेही निर्बंध नव्हते, वेळीची मर्यादा नव्हती. पुण्यात काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून 27 आगीच्या घटना घडल्याचंही सांगण्यात आले.