मुंबई मध्येही आज ऐन एप्रिल महिन्याच्या शेवटाला जून-जुलै महिन्यासारखा पाऊस बरसला आहे. प्रामुख्याने मुंबई शहरातील पश्चिम उपनगरामध्ये या पावसाच्या धारा बसरल्या आहेत. अनेक मुंबईकरांनी या अवकाळी पावसाचे क्षण कॅमेर्‍यात टिपून सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत. अंधेरी,विलेपार्ले, जोगेश्वरी गोरेगाव परिसरात 10-15 मिनिटं पावसाच्या सरी बरसल्या. काही काळाच्या या पावसाने सकाळी उन्हाची काहिली काही प्रमाणात मंदावली आहे. सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.

मुंबईमध्ये पाऊस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)