मुंबईकरांना आता UTS app वरून लोकल ट्रेन पास काढता येणार आहे. 24 नोव्हेंबरच्या सकाळपासून ही सुविधा खुली होणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. रेल्वेकडून सध्या मुंबईकरांना लोकल प्रवासाठी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं पुरावा म्हणून Universal pass दाखवणं बंधनकारक होतं. पण आता रेल्वेनेच प्रवाशांना रांगेत उभं राहण्यापेक्षा ऑनलाईन पास काढण्यासाठी Universal pass सोबत UTS Mobile app लिंक केले आहे. Android वर उपलब्ध असलेले UTS Mobile app आज रात्रीपासून iOS app वर देखील उपलब्ध होत आहे.
ANI Tweet
UTS app for Android is already available & iOS app will be available by tonight. So this facility of UTS app for local train passes can be used from tomorrow morning: Anil Kumar Lohati, General Manager, Central Railway
— ANI (@ANI) November 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)