मुंबई पोलिसांनी सोमवारी शहरासाठी नवीन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. शहरातील विमानतळ आणि हवाई क्षेत्राभोवती 21 जूनपर्यंत उड्डाण क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) द्वारे विमानांच्या  लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दि. 21 जून 2023 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग), विमानाच्या उ्डडाणात (फ्लाईट), उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी (ऑपरेशन्स) विशाल ठाकूर यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)