Mumbai Local Train Update: आज सकाळी मध्य रेल्वेवर मुंबईने लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही समस्यांना सामोरे जावे लागले. ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाडामुळे, कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित झाली होती. आता माहिती मिळत आहे की, ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मुंबई विभागाने केलेल्या सर्वतोपरी प्रयत्नांमुळे ठाण्यातील बिघाड 10:15 वाजता पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू आहेत. मध्य रेल्वेने ही माहिती दिली आहे.

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)